Priya Kokare (प्रिया कोकरे)

                             Narcissist (नार्सिससीस्ट)/Sociopath (सोसिओपॅथ)


     नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ यांना एक प्रकारचा समाजविरोधी मानसिक आजार (Antisocial personality Disorder) असतो. नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ चे मुळ कारण अजुनही अज्ञात आहे. काही शोधांवरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ ही आनुवंशिक कारणांमुळे किंवा लहानपणी केल्या गेलेल्या गैरवर्तन किंवा छळामुळे सुद्धा कारणीभुत ठरू शकते. ५०% नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ हे काही पर्यावरणीय घटकांमुळे किंवा इतर परिस्थिमुळे तयार होतात. नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ हे स्वतःच्या आकर्षकतेचा, मोहकतेचा, कपटवृत्तीचा, लबाडीचा तसेच कधीकधी दमदाटीचा आणि इतर पद्धती वापरून त्यांना जे काही हवे आहे ते मिळवतात.

नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ लोकांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे (The symptoms of narcissistic personality disorder/sociopath):-

१) Superficial Charm ( कृत्रिमरीत्या निर्माण केलेली भुरळ ) :- 
     सोसिओपॅथ या लोकांना चांगलेपणाचा, दयाळुपणाचा, सर्वसामान्य असण्याचा, इतरांना चटकन लक्षात येणारा, इतरांना आवडणारा व आनंद देणारा एक मनाचा खोटा मुखवटा (दिखावा) धारण केलेला असतो. हे लोक चांगली कृत्ये करून त्यांचा सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करतात. अशा व्यक्तींकडे लहान मुलांपासून वृध्द लोकांपर्यंत भुरळ घालण्याची क्षमता असते. त्यांना कोणतीही गोष्ट कशी मिळवायची याचा चांगले अभ्यास असतो. 
     लोकांना योग्य ते प्रश्न विचारून व त्यांचे खोटे/वरवरचे कौतुक करून त्यांना विशेष (Special) जाणवून देण्यामध्ये सोसिओपॅथ हे लोक प्रवीण/हुशार असतात. हे लोक इतरांची फाजिल स्तुती करतात व असे करताना ते जरासुद्धा अडखळत नाहीत व जे काही कौतुक/स्तुती बोलतात ते सहजपणे बोलतात.

२) Pathological lying ( विकृत रित्या खोटे बोलणे ) :- 
     सोसिओपॅथ हे लोक सर्व प्रकारचे लहान मोठे खोटे बोलतात, तसेच वेगवेगळ्या काल्पनिक कथा निर्माण करून ते तुम्हाला भ्रमित करतात किंवा चुकीच्या दिशेने विचार करायला प्रवृत्त करतात. हे लोक दैनंदिन जीवनामध्ये स्वतःच्या चुका लपवण्यासाठी एका पाठोपाठ एक असे खोटे बोलतात. वस्तुस्थितीमध्ये असे लोक जेंव्हा खर बोलतात तेंव्हा त्यांना अस्वस्थ वाटते. जर त्यांचा एखादा अपराध पकडला गेला तर ते खोट बोलणे  चालुच ठेवतात आणि प्रतिगाम (Backpedal) करून स्वतःचे अपराध लपवतात. जर त्यांची एखादी मोठी चूक किंवा खोट पकडले जाणार असेल तर ते तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी ते अतिकृद्ध होऊन स्वतःची चुकी कबुल करतात. सोसिओपॅथ यांना खोटे हे खरे आहे असा भ्रम असतो. ते जे काही बोलतात तेच खर आहे असा त्यांचा समज असतो. ते स्वतःच्या खोट बोलण्यामध्ये विश्वास ठेवतात त्यामुळे ते Lie Detector test सुद्धा पास करू शकतात. सोसिओपॅथ हे फसवे (Deceptive) असतात. हे लोक स्वतःच्या तयार केलेल्या काल्पनिक कथा तसेच लहान मोठ्या गोष्टी, स्वतःच्या आत्मविश्वासाचा व आग्रहीपणाचा वापर करून इतरांना त्या खऱ्या वाटाव्यात अशा रीतीने पटवून देण्यामध्ये प्रवीण असतात.

३) Manipulative Behaviour ( इतरांची मानसिक स्थिती व भावना हाताळण्याची वृत्ती ) :-
    सोसिओपॅथ हे लोक चतुर तसेच युक्तिबाज असतात. सामान्यतः ज्या गोष्टी ते स्वतः करू शकत नाहीत त्या इतरांकडून करवून घेण्यात सोसिओपॅथ हे कुशल असतात. सोसिओपॅथ यांचा मुख्य हेतू हा तुमचा वापर पैसा, मोठे अधिकार/पद, इतरांवर नियंत्रण/सत्ता, मनोरंजन, संरक्षण, सुरक्षितता तसेच पाठिंबा मिळवणे हा असतो. सोसिओपॅथ हे दुसऱ्याची कमजोरी समजावुन घेतात व त्याचा जास्तीत जास्त वापर करतात. सोसिओपॅथ मनोबलाने कमजोर लोकांना स्वतःच्या फायद्यासाठी शिकार बनवतात तसेच स्वतः पेक्षा खंबीर, सामर्थ्यवान लोकांपासून दूर राहतात. सोसिओपॅथ हे एकटे, दुःखी, असुरक्षित व कोणाच्या तरी आश्रयाची गरज असणाऱ्या लोकांना शोधत असतात. 
     खरे सोसिओपॅथ हे इतर व्यक्तींवर त्या विशेष व्यक्तीच्या लक्षात न येता त्यांच्यावर वर्चस्व व नियंत्रण मिळवतात. या लोकांना प्रत्येक परिस्थिती (Situation) नियंत्रण करायला आवडते तसेच प्रत्येक परिस्थितीच्या नियंत्रणात असायला आवडते आणि इतर सामर्थ्यवान हुशार लोकांच्या सानिध्यात या अस्वस्थ असतात. सोसिओपॅथ हे तुमच्यासोबत अशा प्रकारे वागतात की तुमच्यात त्या व्यक्तीबद्दल दया उत्पन्न होते. ते तुमच्यात काळजीची, अपराधीपणाची, भीतीची किंवा दोषीपणाची भावना निर्माण करतात व तुमच्या या स्थितीचा वापर करून तुमच्या मनावर ते नियंत्रण मिळवतात व त्यांना जे काही हवे आहे ते तुमच्याकडून करवून घेतात.

४) Emotional Blackmail and Guilt trip (भावनिकरीत्या ब्लॅकमेल करणे व अपराधीपणाची भावना निर्माण करणे):- 
     जर एखाद्याने , सोसिओपॅथ ने केलेल्या गुन्ह्याचा/दोषाचा आरोप त्याच्यावर केला, तर ते त्या दोषाचे/गुन्ह्याचे कारण हे त्या एखाद्या विशेष व्यक्तीला ठरवतात. यामुळे जो आरोप करणारा व्यक्ती आहे त्याला असे वाटू  लागते की आपण या व्यक्तीला दोष देऊन व त्याच्या वागण्याबद्दल तक्रार करून त्याच्याशी क्रुर व अन्यायकारक वागणुक करत आहोत. आरोप करणाऱ्या व्यक्तीने जे काही मुद्दे उघड करण्याचे ठरवले असेल तर तो व्यक्ती ठामपणे निर्णय न घेता गोंधळून जातो व स्वतःच्या मुद्यांबद्दल पुन्हा एकदा विचार करू लागतो. अशा रीतीने सोसिओपॅथ इतरांना इमोशनल ब्लॅकमेल करतात व अपराधीपणाची भावना तयार करून मनात गोंधळ निर्माण करतात. 
     सोसिओपॅथ हे लोक इतर व्यक्तींच्या भावना व असुरक्षितता यामध्ये स्वतःच्या ईच्छेनुसार बदल घडवून आणण्यात कुशल असतात त्यामुळे इतर व्यक्ती या लोकांना "अत्याचार/अन्याय झालेला मानव" समजते व या दृष्टिकोनामुळे त्या व्यक्तीतील दया, सहानुभूती व प्रेम या भावनांचे जे कवच असते ते कमकुवत होते. या कारणामुळे त्या विशिष्ट व्यक्तीच्या या भावना सोसिओपॅथ कडून वापरण्याकरता अगदी उघड/असुरक्षित पडतात व भविष्यातील त्या व्यक्तीच्या भावनांचे शोषण केले जाऊ शकते.  जर हा भावना स्रोत  अस्विकारण्याजोग्या व वाईट कृती साठी वापरला जात असेल किंवा त्या भावनांशी जोडला जात  असेल तर हे सोसिओपॅथ च्या वास्तविक स्वरूपाबद्दल एक महत्त्वाचे चेतावनी चिन्ह दर्शवते. 
    सोसिओपॅथ हे लोक बनावट भावनिक (अपराधीपणाचा किंवा सहानुभूतीचा) देखावा निर्माण करतात. तर अपराधी व्यक्ती किंवा चिंताग्रस्त व्यक्तींना त्यांनी व्यक्त केलेल्या अपराधीपणाची व असाहाय्यतेची तीव्र भावना जाणवते याउलट सोसिओपॅथ हे या भावनांना फक्त अभिनयासारखे व्यक्त करतात. चिंताग्रस्त व्यक्ती ही सामान्य भावना त्यांना गैरसोयीच्या असल्या तरी इतरांना ते दाखवतात याउलट सोसिओपॅथ हे सामान्य भावनांचा देखावा स्वतःच्या मर्जीनुसार चालू किंवा बंद करू शकतात.  
     जर एखादा व्यक्ती सोसिओपॅथ चे खरे रूप, अपराध, गुन्हा किंवा चुका दुसऱ्यांसमोर उघडकीस आणणार असेल तर सोसिओपॅथ हे त्या व्यक्तीला आत्महत्या करण्याची धमकी देऊन त्याच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून त्याला इमोशनली ब्लॅकमेल करतात. सोसिओपॅथ लोक इतरांवर वर्चस्व मिळवण्याचा, इतरांसोबत वरचढ करण्याचा प्रयत्न करतात.

५) Absence of any feeling of Guilt, Remorse & Shame (दोषीपणा, पश्चात्ताप व लाज या भावनांचा अभाव) :- 
     सोसिओपॅथ हे कोणताही वाईट अपराध व लाजिरवाणे कृत्य करू शकतात आणि त्यांना या गोष्टीचा जरासुद्धा, किंचितही पश्चात्ताप होत नाही. असे लोक इतरांना दुखावताना, त्रास देताना, खोटे बोलताना, दुसऱ्याचे मन दूषित करताना व त्यांना आपल्या मर्जीनुसार नियंत्रण करताना यांना जरासुद्धा पश्चात्ताप होत नाही. आपल्यामुळे ज्या व्यक्तीला त्रास, नुकसान झाले आहे तो आपल्यावर रागावू/रुसू नये म्हणून सोसिओपॅथ आपल्या वाईट वागणुकीबद्दल दोषीपणाचे खोटे ढोंग घेतात. 
उदाहरणार्थ :- ज्याला सोसिओपॅथ मुळे त्रास किंवा नुकसान झाले आहे अशा व्यक्तीसमोर सोसिओपॅथ हे दोषीपणाचे व अपराधीपणाचे अशा रीतीने सोंग घेतात की शेवटी तो व्यक्ती सोसिओपॅथ वर रागावण्याऐवजी त्याचे सांत्वन करतो. 
   सोसिओपॅथ हे लोक त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीवर मनापासून कोणती काळजी करत नाही. ते या व्यक्तींसोबत खोटे बोलतात व फसवतात. हे लोक इतरांकडून भरपूर प्रमाणात घेतात आणि त्याऐवजी त्यांना खूपच कमी देतात. उदा. प्रेम, काळजी, मदत व आपुलकी.

६) Lack of Empathy & Compassion and Incapable of Love ( सहानुभूती, दया व करुणेचा अभाव आणि प्रेम करण्याची असमर्थता ) :- 
    सोसिओपॅथ ना इतरांबद्दल कोणतीही दया व सहानुभूती नसते. यांच्यामध्ये इतरांवर प्रेम करण्याची क्षमता मर्यादेशील असते. सोसिओपॅथ च्या सानिध्यात असणाऱ्या लोकांना, कुटुंबातील सदस्यांना कधी कधी असे वाटते की ते आपली कोणतीही काळजी किंवा पर्वा करत नाही. सोसिओपॅथ हे त्यांना जे काही पाहिजे आहे ते घेण्यासाठी व त्यांना जे काही आवडेल ते करण्यासाठी नेहमीच राजी असतात. त्यांच्या वागण्यामुळे इतरांना त्रास होईल किंवा इतरांचे वर अन्याय होईल याची पर्वा किंवा विचार ते करत नाहीत. हे लोक निष्ठूर तसेच इतरांच्या भावनांबद्दल निष्काळजी असतात. (Callous & unconcern for the feelings of other).

७) Violent & Aggressive Behaviour of Person ( व्यक्तीचे हिंसक,तापट व आक्रमक वर्तन ):-
     सोसिओपॅथ ना मुख्यतः कशाचीही भीती किंवा काळजी वाटत नाही (Less Anxiety). या व्यक्ती असुरक्षित (Insecure) किंवा लाजाळूपणा वाटून घेत नाहीत. या व्यक्तींना स्वतःच्या भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवता येत नाही. उदा. राग, आतुरता व चिडचिड. हे लोक सतत दुसऱ्यांवर ओरडतात तसेच  याआधी उल्लेख केलेल्या भावनांना अविचाराने प्रतिसाद देतात. कधी कधी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे लोक दहशत, धमकी तसेच हिंसेचा वापर करण्यास नेहमी तयार असतात. हे लोक स्वतःमध्ये अतिशय गुंतलेले असतात तसेच यांचा स्वभाव हा अनैसर्गिक तसेच गोंधळवून टाकणारा असतो.

८) Shallow Emotional Response ( अल्प भावनिक प्रतिसाद ):-
      सोसिओपॅथ या व्यक्ती मृत्यु , अपघात किंवा इतर तीव्र प्रसंगांना वरवरचा भावनिक प्रतिसाद व्यक्त करतात.

९) Exceptionally Intelligent ( असामान्य बुद्धिमत्ता ):- 
     सोसिओपॅथ यांचा IQ (Intelligent Quotient: - बौद्धिक पातळी) हा खूप जास्त असतो. या बुद्धिमत्तेचा वापर ते इतरांच्या भल्यासाठी न करता त्यांना फसवण्यासाठी व मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच वेगवेगळ्या गुन्हे करण्यासाठी योजना तयार करण्यासाठी वापरतात. यांची चांगली बौद्धिक पातळी यांना समाजास धोकादायक बनवते. त्यांचा बुद्धीचा वापर त्यांनी शिक्षणामध्ये केल्यास ते चांगल्या ग्रेड ने पास होऊ शकतात.

१०) The Person has huge Ego ( Egocentric - व्यक्ती खूप गर्विष्ठ व अहंकारी असते) :-
     सोसिओपॅथ लोकांना स्वतःबद्दल अतिशय प्रेम, आदर तसेच पसंती असते. हे लोक स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात आणि कधीकधी यांना तसा भ्रम अनुभवास येतो. (Grandiose Self Image)

११) Ability to Feign Normal Human Emotions and Empathy/Dramatic ( सामान्य मानवी भावनांचे ढोंग घेण्याची किंवा नाटक करण्याची क्षमता) :- 
     सोसिओपॅथ या लोकांकडे सामान्य मानवी भावना तसेच सहानुभूती यांची ढोंग करण्याची असामान्य क्षमता/कौशल्य असते. हे लोक प्रेम करण्याचे, दया दाखवण्याचे किंवा एखाद्याबद्दल आवड असण्याचे ढोंग करतात. सामान्य लोकांना इतरांबद्दल जशी प्रेमाची भावना वाटते त्यासारख्या भावनेचा सोसिओपॅथ मध्ये अभाव असतो.

१२) Rationalization of their own immoral behaviour ( स्वतःच्या अनैतिक वागणुकीचे निराकरण करण्यासाठी मानसिक संरक्षक यंत्ररचनेचा वापर):-  
     Rationalization हे एक प्रकारची Defense Mechanism (बचाव यंत्रणा) आहे ज्याच्यामध्ये आपली वादग्रस्त वागणूक, कृत्ये तसेच लहानमोठ्या चुकांचे समर्थन, निराकरण आणि स्पष्टीकरण हे वास्तविक सत्यतेचे स्पष्टीकरण लपवण्यासाठी अतिशय तर्कशुद्ध व बुद्धीला वरवर पटण्याच्या रीतीने केलेले असते जेणेकरून इतरांना ते सहन करण्याजोगे तसेच प्रशंसनीय वाटेल.

१३) Lives like Parasite (परजीवी सारखे आयुष्य):- 
     सोसिओपॅथ यांना जास्त वेळ कमी पगारासाठी कठोर परिश्रम करण्याचा मुद्दा पटत नाही. यांच्याकडे विनामुल्य गोष्टी मिळवण्याचे बरेच सोपे मार्ग असतात. सोसिओपॅथ काही विशिष्ट लोकांना स्वतःच्या करिअर चा पर्याय म्हणून पाहतात. अशा लोकांशी ते प्रेमाचे मानसिक किंवा शारीरिक संबंध तयार करतात. ज्या व्यक्तीशी सोसिओपॅथ ने नाते जोडले आहे त्या व्यक्तीला ते कसे विशेष आहेत,  त्यांच्याकडून जे काही गोष्टी घेणार आहेत त्याची परतफेड ते कशे करतील याची खोटी आश्वासने ते देतात. इतरांकडून पैसे किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ते स्वतः चे एक चांगले, प्रामाणिक, नैतिकवादी व आशावादी असलेले खोटे व्यक्तिमत्त्व निर्माण करतात. हे व्यक्तिमत्व पटवून देण्यासाठी व पैसे मिळवण्यासाठी सोसिओपॅथ हे विविध व्यवसायाच्या योजनांबद्दल, एखाद्या उत्तम करिअरबद्दल किंवा दुर्दैवामुळे पैशाच्या कमतरतेमुळे येणाऱ्या वाईट अनुभवांबद्दल बोलेल. पैसे लुबाडण्यासाठी कधी कधी ते स्वतः किती मोठया आर्थिक संकटात सापडलो आहे हे पटवून देण्यासाठी काल्पनिक कहाण्या रचतात किंवा खोटी परिस्थिती निर्माण करतात.  
     सोसिओपॅथ यांना दुसऱ्यांकडून काहीही विनामुल्य मिळवणे आवडते. ते याला स्वतःचा विजय समजतात व त्यांना ते चांगले वाटते. हे दोन कारणांमुळे त्यांना चांगले वाटते. 
१) व्यावहारिक दृष्टीने जे इतर लोक एखादी गोष्ट विनामुल्य देतात ते लोक किती मुर्ख आहेत हे सिद्ध होते. 
(म्हणून सोसिओपॅथ किती हुशार आहेत हे सुद्धा सिद्ध होते).
२)  हे त्यांना अगदी कमी तणाव, प्रयत्न, जबाबदारी व कोणत्याही वचनबद्धतेशिवाय जीवनात सर्वोत्कृष्ट मिळवण्यास सक्षम करते. सर्व सोसिओपॅथ मध्ये इतरांकडून विनामूल्य गोष्टी मिळवण्याची वृत्ती असते.
     
     संकटाच्या वेळेला जेंव्हा इतर व्यक्तीपासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर त्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी किंवा इतरांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर सोसिओपॅथ स्वतःच्या आर्थिक परिस्थितीबद्दल व पार्श्वभूमीबद्दल खऱ्या गोष्टी लपवतात व खोट्या कहाण्या निर्माण करून स्वतः शक्तिशाली आहे व त्यांच्याकडे प्रचंड मनुष्य पाठबळ आहे असे सिद्ध करतात व अशा रीतीने ते इतरांवर वर्चस्व मिळवायला बघतात. सोसिओपॅथ चे वागणे व बोलणे त्याच्या गरजेप्रमाणे बदलते. जर त्याला इतरांवर वर्चस्व मिळवायचे असेल तर तो त्याचा कुटुंबामध्ये व नातेवाईकांमध्ये काही लोक पोलीस किंवा राजकारणी आहेत असे सांगतो. जर त्याला इतरांकडून दया व सहानुभूती हवी असेल तर तो स्वतःला गरीब, निराधार, दुर्दैवी व दुःखी कष्टी आहे असे दाखवतो. सोसिओपॅथ त्याच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांना त्याच्या शत्रूंबद्दल द्वेष, नकारात्मक भावना निर्माण करतो व भडकवतो. सोसिओपॅथ स्वतःच्या शत्रूविरुद्ध लढण्यासाठी इतर लोक जे त्याच्या प्रभावाखाली आहेत त्यांचा वापर करतो.  

१४) Immaturity ( अपरिपक्व/ अप्रौढ ) :- 
     सोसिओपॅथ हे लोक बहुदाकरून अपरिपक्व/इम्म्याचुअर असतात कारण ते भुतकाळापासून काहीही शिकत नाहीत आणि त्याच चुकांची पुनरावृत्ती वारंवार करतात. हे लोक वाढण्यास असमर्थ असतात व इतर मानवांसाठी आदर असलेल्या अधिक परिपक्व/म्याचुअर पद्धतीने कार्य करू शकत नाहीत. सोसिओपॅथ ना दुसऱ्यांच्या हक्कांची मनापासून काळजी नसते. पण तो काळजी करण्याचे ढोंग करू शकतो जर त्याला असे वाटले की ते आपल्या फायद्यासाठी आहे. 
     सोसिओपॅथ हा एखाद्या किशोरवयीन व्यक्तीसारखा मागणी करणारा/हट्टी व स्वार्थी असतो. ते फक्त त्यांच्या स्वतःच्या गरजा विचार करतात (त्यात माझ्यासाठी काय आहे)? सोसिओपॅथ हे इतरांच्या गरजांना स्वतःच्या गरजांआधी प्राधान्य देण्यास असमर्थ असतो. एखाद्या सोसिओपॅथ साठी सर्व जग त्याच्याभोवती फिरत आहे असा समज असतो(सर्व घडामोडी त्याच्याच साठी होत आहेत असे वाटते).

१५) They Play Victim (स्वतः शिकार/बळी असलेल्याचा आव आणणे) :- 
      एखाद्याने Victim Card खेळणे म्हणजे स्वतःवर अत्याचार झालेला (पीडित मनुष्य) आहे असा आभास निर्माण करणे. दुसऱ्याचा मनात त्याच्याबद्दल सहानुभूती व दया निर्माण करण्यासाठी सोसिओपॅथ त्याचे बालपण किती भयानक होते याची कथा तो सांगेल. त्याच्या मित्र/मैत्रिणींनी त्या सोसिओपॅथ व्यक्तीला कशी वाईट वागणुक दिली याचे वर्णन करेल. ती व्यक्ती दया व सहानुभूती जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या रचना केलेली अविश्वसनीय कथा निर्माण करेल. जर त्या व्यक्तीचे खोटे जवळजवळ पकडले गेले तर ती व्यक्ती यापासून इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेल आणि त्या व्यक्तीबद्दल इतरांना खेद किंवा दया निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.
     काही जणांना असे आढळून येईल की बहुतेक वेळा जेंव्हा सोसिओपॅथ त्याने केलेल्या गुन्ह्यामध्ये, अपराधामध्ये किंवा खोटे बोलण्यामध्ये पकडला जाईल तेंव्हा तो अचानक खूप आजारी पडेल (आजारी पडण्याचे नाटक करेल) व त्याला जवळजवळ हॉस्पिटल ची गरज लागेल. इतरांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी तो व्यक्ती त्याच्याजवळच्या लोकांच्या भयानक जीवघेण्या धोक्याच्या आजारांचे किस्से सांगेल. 
     त्याची पीडित व्यक्तीमध्ये बदलण्याची क्षमता इतरांना त्याच्याबद्दल दया वाटण्यास प्रवृत्त करते. त्याच्यामुळे जर एखादी व्यक्ती सोसिओपॅथ बद्दल सत्य शोधण्याच्या, त्याचे खरे रूप जाणण्याच्या खूप जवळ असेल तर त्याचे लक्ष विचलित होईल व तो भावनेच्या आहारी जाईल. इतर व्यक्तीला सोसिओपॅथ कमकुवत व अरक्षित वाटेल. हे इतरांना त्यांचा कमजोरी व अरक्षितता उघडण्यास प्रोत्साहित करेल. हे विश्वासाचा चुकीचा समज आणि खोटे बंध निर्माण करेल की जो दोन व्यक्तींमध्ये जाणवतो जेंव्हा ते स्वतःच्या असुरक्षितता एकमेकांसोबत चर्चा करतात.

१६) इतर महत्वाची लक्षणे:- 

सोसिओपॅथ हे लोक बहुतकरून एकटे राहणे पसंद करतात. हे एखाद्या ठिकाणी जास्त वेळ राहण्यास किंवा नोकरी टिकविण्यास अकार्यक्षम असतात. 

सोसिओपॅथ हे लोक एखाद्या गोष्टीला लगेच कंटाळून जातात.यांना सतत मनोरंजन व उत्तेजनाची गरज असते. 

सोसिओपॅथ विलक्षण धाडसी वर्तणूक करतात. हे लोक समाजाच्या रूढी पलीकडे असणाऱ्या कृती करतात. हे लोक कोणतेही विचित्र, धोकादायक व नीतीनियमाविरुद्ध असलेले काम त्याचा विपरीत परिणाम जाणून न घेता करतात. 

सोसिओपॅथ लोकांमध्ये सुज्ञता किंवा निर्णय घेण्याची क्षमता नसते हे स्वतःच्या चुकांवरून किंवा अनुभवांवरून कधीही शिकत नाहीत कारण ते इतरांपेक्षा श्रेष्ठ व बुद्धिमान आहेत असा त्यांचा भ्रम/समज असतो. स्वतःच्या जीवनातील योजना व उद्देश्यांचे अनुसरण करण्यात हे अयशस्वी ठरतात. 

सोसिओपॅथ हे लोक बहुदाकरून माफी किंवा दिलगिरी व्यक्त करत नाहीत. जरी त्यांचा चुकीचा पुरावा त्यांना दाखवला तरी ते माफी मागण्यास नाकारतात. स्वतःच्या चुका तसेच दोष ते उघडपणे नाकारतात.  

सोसिओपॅथ हे लोक स्वतःच्या वागणुकीचा व चुकांचा दोष ते इतरांवर ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

सोसिओपॅथ हे लोक जास्त करून Secretive असतात. एखादी गोष्ट करण्याच्या पद्धतीमध्ये तसेच त्यांचा हेतू व उद्देशामध्ये अतिशय गुप्तता राखतात. 

सोसिओपॅथ हे लोक कोणतीही जबाबदारी, कर्तव्य व उत्तरदायित्व स्विकारत नाहीत परंतु इतरांवर त्या जबाबदारीचा ठपका टाकून मोकळे होतात. 

सोसिओपॅथ या लोकांना कोणताही युक्तिवाद किंवा भांडण हारण्यास आवडत नाही आणि ते त्यांनी जे खोटे बोलून मायाजाळ निर्माण केलेले असते त्याचे अतिशय लबाडीने संरक्षण करतात. ते स्वतःच्या खोटेपणाच्या जाळ्याचे संरक्षण करण्यासाठी तार्किक मूर्खपणाच्या पातळीचे बोलणे करतात.


How to dispel illusion and get to the truth. 
(भ्रम नाहीसा करून सत्य जाणून घेणे)

     सोसिओपॅथ हे स्वतःच्या चुकांचे समर्थन किंवा निराकरण करण्यासाठी काल्पनिक स्पष्टीकरण रचण्यात व जुळवण्यात प्रवीण असतात. जेंव्हा सोसिओपॅथ प्रत्यक्ष गुन्हा करत असताना पकडले जातात तेंव्हा ते रागाने व दमदाटीने प्रतिक्रिया देतात.त्यानंतर ते ज्या कोणत्या गोष्टीसाठी रंगेहात पकडले गेले आहेत त्याचे कारण स्पष्ट करून अनिश्चितता व संशय दूर करण्यासाठी बनावट कहाण्या जुळवतात. उदाहरणार्थ :- एखादा सोसिओपॅथ जर पैशाने भरलेली सुटकेस नेमकी चोरी करताना पकडला गेला असल्यास तो कदाचित स्पष्टपणे असे सांगू शकतो की त्याने ते पैसे इतरांपासुन चोरी होण्यापासून वाचवले आहेत आणि तो त्या पैशाचा खरा मालक कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रीतीने तो स्वतःला नीतीला धरून असलेला तत्वज्ञानी हिरो/नायक सिद्ध करतो. पण अद्यापपर्यंत वास्तवामध्ये त्याने सगळे पैसे बळकावून स्वतःजवळ ठेवलेले असतात. जर तुम्ही त्याला पैशांबद्दल विचारले तर तो त्याचा प्रामाणिकपणा बद्दल असा प्रश्न का विचारला म्हणून तुमच्यावर आक्रमक होऊन चढाई करेल.

     सोसिओपॅथ हे स्वतःला उच्च नैतिक आणि तत्वज्ञानी असलेले नायक म्हणून सादर करण्यामध्ये प्रविण (एक्स्पर्ट) असतात. पण वास्तविकतेत सोसिओपॅथ हे आतून गुन्हेगारी वृत्तीचे असतात जे चोरी करतात, समाजाला किंवा व्यक्तीला क्षीण करतात, फसवणूक करतात आणि बऱ्याचदा संपूर्ण समुदायामध्ये भावनिक अनागोंदी/गोंधळ भडकवतात.
     सोसिओपॅथ हे एका समूहाला दुसऱ्या समूहा विरुद्ध करण्यामध्ये प्रविण असतात याचवेळी ते आपण स्वतःला इतरांचा रक्षणकर्ता किंवा तारणहार आहे असे जाहीर करतात. ते जिथे जिथे जातात तिथे स्वतःच्या फायद्यासाठी व बचावासाठी संघर्ष, वादविवाद व द्वेष निर्माण करतात आणि तरीही हे सर्व करण्यामध्ये त्यांची स्वतःची भूमिका आहे हे समजण्यास ते पुर्णपणे अयशस्वी होतात. सोसिओपॅथ हे इतक्या वेगवेगळ्या व उच्च पातळीवर भ्रामक असतात की ते तार्किक/तर्कशुद्ध युक्तिवादाला सुद्धा विरोध करतात.
आपण सोसिओपॅथ सोबत तर्कशुद्ध चर्चा करू शकत नाही. असे करण्याचा प्रयत्न केवळ आपला वेळ वाया
घालवतो आणि सोसिओपॅथ ला त्रस्त करून सोडतो.




Tips for exposing sociopaths: Start fact checking  something Sociopath claim. ( सोसिओपॅथ जे काही दावा करतात व बोलतात त्याची वस्तुस्थिती, सत्यस्थिती तपासून बघणे ) 


     चुकीचा समज, भ्रम व गैरसमजुत नाहीसा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सोसिओपॅथ जे काही बोलतात त्याची सत्यता तपासून पाहणे हा आहे. जर तुम्ही जास्त खोलात जाऊ लागलात तर तुम्हाला वारंवार विसंगतीचा एक नमुना आढळेल.  संशयित सोशियोपॅथचा विसंगतीसह (त्याने जो दावा केला होता आणि जे वस्तुस्थितीत आहे यांच्यातला फरक) सामना करा आणि काय होते ते पहा.  बहुतेक सोसिओपॅथ लोकांच्या प्रामाणिकपणाबद्दल/सचोटीवर प्रश्न पडल्यास ते संतप्त किंवा आक्रमक होतील, तर एखादी सामान्य, शहाणा व सुज्ञ व्यक्ती कोणत्याही चुकीची माहिती किंवा गैरसमज दूर करण्यास सहजपणे मदत करेल.
     इतर व्यक्ती ज्या सोसिओपॅथ च्या प्रभावाखाली आहेत त्यांना प्रश्न विचारून सत्यस्थिती तपासण्यापासून सावध रहा. सोसिओपॅथ जवळ सामान्यतः निष्ठावंत सोबती/मित्र/सहकारी असतात की जे फक्त त्यांच्या काल्पनिक गोष्टींवर विश्वासच ठेवत नाहीत तर ते त्या गोष्टी वास्तविकपणे अशा सीमेपर्यंत स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या रचनेमध्ये आत्मसात (अंतर्गत करतात) करतात की सोसिओपॅथ च्या काल्पनिक कथांशी जुळवून घेण्यासाठी (सुसंगत राहण्यासाठी) ते स्वतःच्या स्मृती पुनर्लिखित करतात. थोडक्यात सोसिओपॅथ च्या प्रभावाखाली असलेली व्यक्ती त्याने वारंवार सांगितलेल्या काल्पनिक कथांची एक वास्तविक सत्य म्हणून स्मृती निर्माण करतात.
उदाहरणार्थ :- जर एखाद्या गुरु शैलीतील सोसिओपॅथ सतत त्याच्या "लेव्हिटेशन सेशन" (हवेत अंतराळी राहण्याचे प्रशिक्षण सत्र) बद्दल त्याच्या अनुयायांना सांगू लागला तर त्यांच्यातले काही अनुयायी लगेच किंवा काही काळाने काल्पनिक स्मृती तयार करायला सुरु करतात की ज्यामध्ये ते त्यांचा गुरु जमिनीपासून अधांतरी अंतराळी आहे अशी कल्पना करतात. म्हणून जर तुम्ही लोकांना विचारले "तुम्ही या व्यक्तीला प्रत्यक्षात अंतराळी पहिले आहे का?" तर ते मोठ्या उत्साहाने म्हणतील "होय!" कारण त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये तो भ्रम एक स्पष्ट व ठळक स्मृतीपासून अविभाज्य बनलेला असतो.
     सोसिओपॅथ राजकारण्यांबाबत सुद्धा ही गोष्ट खरी ठरते. जर एखाद्या प्रभावी राजकारण्याने असा दावा केला की त्याने "लाखो रोजगार निर्माण केले आहेत" जरी त्याच्या आर्थिक धोरणांमुळे प्रत्यक्षात नोकऱ्या नष्ट झालेल्याअसल्या व मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पसरली असली. असे असूनही त्याचे निष्ठावंत अनुयायी त्याचे हे खोटे सतत पुनरावृत्ती करतील व त्या राजकारण्याने कितीतरी रोजगार निर्माण केला आहे असे उघडपणे जाहीर करतील.

     याच कारणांसाठी सोसिओपॅथच्या सत्यस्थितीची/वस्तुस्थितीची पडताळणी करायची असेल तर त्याच्या प्रभावाखाली नसलेल्या लोकांपासुन पुरावे गोळा करणे आवश्यक आहे. सोसिओपॅथ ने जे काही म्हणले आहे किंवा त्याने जो काही दावा केला आहे तो जर त्याच्या प्रत्यक्ष नियंत्रणात नसणाऱ्या आवाक्यातील वस्तुस्थितीला मिळताजुळता नसेल तर तुम्ही ती व्यक्ती सोसिओपॅथ आहे असे समजावे.


Sociopaths never answer facts; they always attack the messenger ( सोशियोपाथ लोक कधीच तथ्यांना उत्तर देत नाहीत; ते नेहमी आरोप करणाऱ्यावर चढाई करतात ) :-



     सोसिओपॅथ शोधण्याचा प्रयत्न करताना आणखी एक महत्वाचा मार्ग म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणा वर संशय घेतल्यावर ते कोणती प्रतिक्रिया देतात ते पाहणे. जर सोसिओपॅथ ना त्यांनी इतरांना खोटे बोलले व फसवले  याचे पुरावे, तथ्ये आणि कागदपत्रे दाखवली तर ते पुराव्याकडे लक्ष न देता आरोप करणाऱ्यावरच चढाई/हल्ला करतात. जर तुम्ही खरोखरच सोसिओपॅथ ला कागदोपत्री आरोपांबद्दल उत्तर द्यायला मजबूर केले तर त लगेच तुमच्या विरुद्ध जातात, तुमचा निषेध करतात, तुमच्या विरुद्ध लोकांच्यात उघडपणे बोलतात, तुम्हाला दोष देतात आणि आरोप करणारा त्याच्याविरुद्ध गुप्तरित्या कट रचत आहे असे स्पष्ट मत गंभीरपणे व्यक्त करतात. जर कोणी सोसिओपॅथच्या ब्रेन वॉशिंग ला बळी पडला नाही तर त्याला लवकरच सोसिओपॅथ व त्यांच्या अनुयायांच्या समुहाबाहेर काढले जाईल व इतर अनुयायांपासून त्याला रानटी पद्धतीने अपमानित केले जाईल.
















































Comments

Popular posts from this blog

Antisocial Personality Disorder in Marathi

Manjurani Kokare (मंजुरानी कोकरे)