Priya Kokare (प्रिया कोकरे)
Narcissist (नार्सिससीस्ट)/Sociopath (सोसिओपॅथ) नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ यांना एक प्रकारचा समाजविरोधी मानसिक आजार (Antisocial personality Disorder) असतो. नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ चे मुळ कारण अजुनही अज्ञात आहे. काही शोधांवरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ ही आनुवंशिक कारणांमुळे किंवा लहानपणी केल्या गेलेल्या गैरवर्तन किंवा छळामुळे सुद्धा कारणीभुत ठरू शकते. ५०% नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ हे काही पर्यावरणीय घटकांमुळे किंवा इतर परिस्थिमुळे तयार होतात. नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ हे स्वतःच्या आकर्षकतेचा, मोहकतेचा, कपटवृत्तीचा, लबाडीचा तसेच कधीकधी दमदाटीचा आणि इतर पद्धती वापरून त्यांना जे काही हवे आहे ते मिळवतात. नार्सिससीस्ट/सोसिओपॅथ लोकांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे (The symptoms of narcissistic personality disorder/sociopath):- १) Superficial Charm ( कृत्रिमरीत्...